vishwas patil mantrayalay | Sarkarnama

विश्वास पाटील यांच्या वादग्रस्त निर्णयांची माहिती मागविली

तुषार खरात
शुक्रवार, 7 जुलै 2017

मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विेश्वास पाटील यांनी निवृत्तीच्या अगोदर महिनाभरात घेतलेल्या निर्णयांची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी मागिवली आहे. गृहनिर्माण खात्याचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांना याबाबत महेता यांनी आदेशपत्र पाठविले आहे. 

विश्वास पाटील यांच्या कार्यालयातील तसेच त्यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) यांच्याकडील आवक जावक नोंदवही, महत्वाचे पत्रव्यवहार, मंजूर केलेल्या फाईल्स याबाबतच्या इत्यंभूत माहितीची पूर्ण यादी महेता यांनी मागिवली आहे. या कालावधीत काही चुकीचे निर्णय घेतले असल्यास त्याचीही माहिती देण्याबाबत या आदेशात नमूद केले आहे. महेता यांच्या कार्यालयामार्फत हे गोपनीय पत्र 4 जुलै रोजी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

विश्वास पाटील हे 30 जून रोजी निवृत्त झाले आहेत. त्यांनी शेवटच्या आठवड्यात तब्बल 450 फाईंल्सना मंजुरी दिल्या आहेत. यातील साधारण 150 फाईल्स म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी तपासणीसाठी ताब्यात घेतल्या आहेत. पाटील यांच्या निवृत्तीनंतर एसआरएची अतिरिक्त जबाबदारी म्हैसकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

पाटील यांनी जाता जाता बांधकाम क्षेत्रातील धनदांडग्यांचे हितसंबंध असलेल्या फाईल्सना मोठ्या प्रमाणात मंजुरी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री महेता यांनी पाटील यांच्या शेवटच्या महिनाभरातील कारभाराची माहिती मागवून घेतली आहे. 
 
संबंधित लेख