vishwas kohakade elected unopposed | Sarkarnama

शिरूर पंचायत समितीच्या सभापतिपदी विश्वास कोहकडे

नितीन बारवकर
शुक्रवार, 27 जुलै 2018

शिरूर : शिरूर पंचायत समितीच्या सभापतिपदी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विश्वास कृष्णाजी कोहकडे यांची आज बिनविरोध निवड झाली. पक्षाने नेमून दिलेला कार्यकाल संपल्याने सुभाष उमाप यांनी राजीनामा दिल्याने पंचायत समितीचे सभापतिपद रिक्त झाले होते.

या रिक्त पदाच्या निवडीसाठी आज सदस्यांची सभा झाली. शिरूर पंचायत समितीचे एकूण 14 सदस्य असून, राष्ट्रवादी आठ, भारतीय जनता पक्ष तीन, लोकशाही क्रांती आघाडी दोन व शिवसेना एक असे पक्षीय बलाबल आहे. "राष्ट्रवादी' तील नाराजांना गळाला लावून सभापतिपदावर दावा सांगण्याचा विरोधकांचा होरा होता. परंतु तो अपयशी ठरला.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक पवार, पोपटराव गावडे व सूर्यकांत पलांडे यांनी निवडणुकीपूर्वी "राष्ट्रवादी' च्या सदस्यांशी चर्चा करून व्यूहरचना केली होती. पक्षाच्या सर्व सदस्यांना "व्हीप' बजावण्यात आला होता. 

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी भाऊसाहेब गलंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडणुकीचे कामकाज सुरू होताच, सभापतिपदासाठी "राष्ट्रवादी' कडून कोहकडे यांनी; तर लोकशाही क्रांती आघाडीचे विजय रणसिंग यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, माघारीच्या मुदतीत बहुमताची खात्री नसल्याने रणसिंग यांनी माघार घेतली. त्यामुळे कोहकडे यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याचे गलंडे यांनी जाहीर केले.

ही निवड जाहीर होताच कोहकडे समर्थक व "राष्ट्रवादी' च्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. प्रदीप गारटकर यांच्या हस्ते कोहकडे यांचा फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

विधानसभेनंतर तालुक्यात झालेल्या सर्व निवडणुकांत "राष्ट्रवादी' ने विजयी पताका फडकावली असून, आगामी विधानसभा निवडणुकीतही विजयाची ही परंपरा कायम राखण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असे आवाहन गारटकर यांनी केले. सर्व सदस्यांच्या सहकार्याने माझी सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याने सर्वांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. तालुक्‍यातील जनतेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न या पदाच्या माध्यमातून केला जाईल, असे नवनिर्वाचीत सभापती कोहकडे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले. 
 
संबंधित लेख