पलूसमधून विश्‍वजीत कदम निवडणूक लढविणार

 पलूसमधून विश्‍वजीत कदम निवडणूक लढविणार

पुणे : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 28 मे रोजी मतदान होणार आहे. कॉंग्रेसच्यावतीने प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम ही निवडणूक लढविणार आहेत. येत्या दोन दिवसात पक्षाकडून विश्‍वजीत यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. मात्र भाजपसह इतर विरोधक उमेदवार उभा करणार की विश्‍वजीत कदम यांना बिनविरोध निवडून देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पतंगराव कदम यांनी सुमारे 30 वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 9 मार्च रोजी पतंगराव कदम यांचे निधन झाले.त्या रिक्त जागेवर ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून विश्‍वजीत कदम पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत विश्‍वजीत यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविली होती. यावेळी ते सांगली लोकसभा मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र पतंगराव कदम यांच्या आकस्मिक निधनाने विश्‍वजीत यांना वडिलांच्या रिक्त जागेवर म्हणजे विधानसभेची निवडणूक लढवावी लागणार आहे. 


मात्र यामुळे विश्‍वजीत यांना सध्यातरी राज्यातील राजकारणातच सक्रिय राहावे लागणार आहे.या निवडणुकीत उमेदवार उभा करण्याबाबत भाजपसह इतर पक्षांनी आपली भूमिका जाहीर केली नसली तरी येत्या दोन-चार दिवसात याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्‍यता आहे. पतंगराव कदम यांच्याशी सर्वच पक्षांतील नेत्यांशी उत्तम संबंध होते. त्यामुळे विरोधक ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतील, असे वाटत नाही. मात्र भारतीय जनता पक्ष नेमकी काय भूमिका घेणार या बाबत उत्सुकता आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com