vishvas patil | Sarkarnama

विश्‍वास पाटलांनी महाडिकांचा आदेश शिरसावंद्य मानला!

सुनील पाटील 
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या (गोकुळ) करवीर तालुका संपर्क सभेमध्ये बुधवारी (ता. 12) राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्‍वास नेजदार यांना सत्तारूढ संचालकांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर नेजदार यांना झालेल्या धक्काबुक्कीबद्दल गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

गोकुळ दूधसंघाचे नेतृत्व करणारे महादेवराव महाडिक यांनी आज सकाळी विश्वास नेजदार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी कालच आपण विश्वास पाटील यांना घेऊन नेजदार यांच्या घरी येणार होतो आणि माफी मागणार होतो, असे सांगणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान या दिवसभराच्या घडामोडी नंतर गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनीही लेखी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. 

संबंधित लेख