vishvas nangare patil in satara | Sarkarnama

IG विश्‍वास नांगरे-पाटील साताऱ्यात; परिस्थिती नियंत्रणाखाली 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

साताऱ्यात शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. काही आंदोलक युवकांनी महामार्ग आडविल्यानंतर गैरसमजाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दगडफेक सुरू झाली. एसपी, डीवायएसपी घटनास्थळी गेले होते. परंतू ही घटना दुर्देवी असून अफवांवर कोणीही विश्‍वास ठेऊ नये. आंदोलकांत घुसून काही असामाजिकतत्व सहभागी झाल्याची शक्‍यताही नाकाराता येत नाही. त्याचाही आम्ही तपासणी करू.

- विश्‍वास नांगरे पाटील 

सातारा : मराठा क्रांती मोर्चाचे साताऱ्यातील आंदोलन चिघळल्याच्या पार्श्‍वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी पोलिस अधीक्षकांकडून सर्व परिस्थितीची माहिती घेऊन आंदोलनस्थळाची पहाणी केली. 

साताऱ्यातील परिस्थिती नियंत्रणाखाली असून आंदोलकांनी पोलिसांना सहकार्याची भुमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 

मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनास आज साताऱ्यात गालबोट लागले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगविण्यासाठी अश्रूधूर व लाठीचार्ज केला. यामुळे आंदोलन चिघळले. दुपार परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. पण पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने आंदोलक पांगले. यासर्वपरिस्थितीची माहिती घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील हे साताऱ्यात दाखल झाले. 

 

संबंधित लेख