विश्वजितराजेंना अपेक्षित असलेला माणमधील 'तो' सुसंस्कृत नेता कोण?

माण मतदारसंघातून एक सुसंस्कृत नेता निवडून येईल, याची सर्वांना खात्री आहे. आपले आमदारकीचे दोन महिने व्यवस्थित काढावेत. कारण आगामी काळात जयकुमार गोरे यांचा पराभव होणार, हे नक्की आहे.
विश्वजितराजेंना अपेक्षित असलेला माणमधील 'तो' सुसंस्कृत नेता कोण?

फलटण (सातारा) : गेले काही दिवस माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून सुरू असलेल्या टिकेला फलटणच्या निंबाळकर घराण्याकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. 

नव्या पिढीचे प्रतिनिधी आणि फलटण पंचायत समितीचे सदस्य विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी आमदार गोरे यांची संभावना 'गावगुंड' अशी केली आहे. गोरे हे विकासकामांत पुर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून त्यांच्या फालतूगिरीचा अंत जवळ आल्याचे म्हटले आहे. त्याबरोबरत माणमध्ये एक सुसंस्कृत नेता निवडून येईल असे भाकित त्यांनी केले आहे. त्यामुळे फलटणचे निंबाळकर माणच्या राजकारणात यावेळी जातीने लक्ष घालणार, हे स्पष्ट आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com