vishvajeet kadam criticise vishal patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

देशात 277 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर
देशात एनडीएचे 314 उमेदवार आघाडीवर असून यूपीएचे 112 उमेदवार आघाडीवर आहे.
पूनम महाजन - 850 मतांनी आघाडीवर, प्रिया दत्त पिछाडीवर
राहुल गांधी पिछाडीवरून पुन्हा आघाडीवर
पुणे : पहिल्या फेरित एनडीए तीनशे जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
रायबरेलीत सोनिया गांधी आघाडीवर आहेत
दक्षिण मध्य मुंबईत पहिल्या फेरीत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे आघाडीवर...

ती हिंमत विशाल पाटलांमध्ये नाही! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 मार्च 2019

कॉंग्रेसने ही जागा लढवलीच पाहिजे, अशी ठाम भूमिका मी घेतली आहे.

सांगली : चाळीस वर्षे ज्यांच्या घरात खासदारकी आहे ते विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणक लढवण्यापासून पळ का काढत आहेत, असा घणाघात आमदार विश्‍वजीत कदम यांनी आज केला.
सांगलीची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला दिल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेस पक्षात हल्लकल्लोळ माजल्यानंतर श्री कदम यांनी 'अस्मिता' बंगल्यावर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यावेळी कॉंग्रेस पक्षच इथून लढेल मात्र पक्ष जो अंतिम निर्णय घेईल, त्यासोबत आम्ही राहु, असे कदम म्हणाले.

कदम म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पुण्यातील बैठकीत खुद्द विशाल पाटील यांनीच प्रतीक पाटील यांचा मतदारसंघात संपर्क नाही असे सांगून ते निवडणूक लढवण्यास सक्षम नाहीत असे जाहीर केले. त्यावेळीही आम्ही कोणतीही भूमिका न घेता पक्षाच्या निर्णयासोबत राहू अशी स्पष्ट ग्वाही दिली होती. आज मात्र तेच विशाल पाटील स्वाभीमानीला उमेदवारी बहाल केल्याबद्दल इतरांवर खापर फोडत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर तेच पुढे येऊन मी लढतोय असे का सांगत नाहीत? ''

कॉंग्रेसने ही जागा लढवलीच पाहिजे, अशी ठाम भूमिका मी घेतली आहे. त्यासाठी तीन दिवसांपुर्वी मी खासदार राजू शेट्टी यांची जयसिंगपूरला भेट घेतली होती. त्यात तुम्ही सांगलीची जागा मागू नका अशी विनंती केली होती. सांगलीत कॉंग्रेस लढावी, यासाठी आम्ही ठोस कृती केली. विशाल पाटील यांनी काय केले हे सांगावे. आम्ही शेवटपर्यंत पक्षाकडे आग्रही भुमिका घेऊ मात्र शेवटी पक्ष निर्णय घेईल त्यांच्यासोबत आम्ही राहू. कॉंग्रेस पक्षात विशाल, प्रतिक आणि पृथ्वीराज पाटील यापैकी कोणीही उमेदवार पक्षाने दिला तर आम्ही ताकदीने त्याच्यासोबत असू, असे कदम म्हणाले. 

संबंधित लेख