vishvajeet kadam and vishal patil issue in sangli maratha aandolan | Sarkarnama

#MaharashtraBandh विश्‍वजित कदम, विशाल पाटलांना आंदोलकांत बसावे लागले!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पुणे : सांगली शहरात आज अत्यंत शांततेत मात्र कडकडीत बंद पाळून आंदोलन झाले. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना मात्र आंदोलकांनी बाजूलाच ठेवले. 

पुणे : सांगली शहरात आज अत्यंत शांततेत मात्र कडकडीत बंद पाळून आंदोलन झाले. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना मात्र आंदोलकांनी बाजूलाच ठेवले. 

आमदार विश्‍वजीत कदम, युवा नेते विशाल पाटील व श्रीनिवास पाटील या नेत्यांना भाषण करू दिले नाही. मंचावर येऊ दिले नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरच आंदोलकांसमवेत बसावे लागले. या नेत्यांचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकारांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काही छायाचित्रकारांना धक्काबुक्की झाली. त्यांच्या गाड्यांच्या किल्ल्या काढून घेण्यात आल्या. आर्थात संयोजकांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. हा प्रकार येथील स्टेशन चौकात झालेल्या आंदोलनावेळी झाला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख