राजनाथसिंह, गोयल यांच्यानंतर पवार थेट मोदींच्या भेटीला..दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबते

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
ncp president sharad pawar meet prime minister narendra modi
ncp president sharad pawar meet prime minister narendra modi

नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. सुमारे तासभर झालेल्या या भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांकडून स्वबळाची भाषा सुरू आहे. या पार्श्वभूमीवरही या भेटीकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान कार्यालयाने या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला आहे. 

शरद पवार यांनी सकाळी साडेदहाच्या सुमारास नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. पवारांनी काल (ता.16) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर वाणिज्यमंत्री व राज्यसभेतील सभागृह नेता पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. 

पुढील 2024 मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वगळता इतर पक्षांचे नेतृत्व पवार करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याचबरोबर पवार हे राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत असल्याचीही चर्चा आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे पवारांना दोन वेळा भेटले होते. त्यानंतर किशोर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हापासून वेगवेगळी चर्चा सुरू आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसला सत्तेत योग्य स्थान दिले जात नसल्याची अनेक नेत्यांची तक्रार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर स्वबळाचीच भाषा सुरू केली होती. तसेच. त्यांनी पवारांवरही निशाणा साधला होता. या घडामोडींचा पवार-मोदी भेटीशी संबंध जोडला जात आहे. 

नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सातत्याने स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा वापरत आहेत. त्यावरून महाविकास आघाडीचे प्रमुख मानले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून आघाडीतील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी भेटायला आलेल्या काँग्रेस नेत्यांनाही पवारांनी जाब विचारला होता. त्यानंतरही नाना आपल्या घोषणेवर ठाम आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com