विष्णू सवरा यांच्या कन्येला शिवसेनेने धूळ चारली 

विष्णू सवरा यांच्या कन्येला शिवसेनेने धूळ चारली 

वाडा : वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांना जोरदार धक्का बसला असून शिवसेनेने नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे. वाड्याच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निशा सवरा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेने सवरा यांना जोरदार धक्का देत नगरपंचायतीवर भगवा फडकविला आहे. शिवसेनेच्या गीतांजली कोळेकर विजयी झाल्या आहेत. 

कोळेकर यांनी 3 हजार 119 मते मिळवून 442 मतांधिक्‍क्‍याने निशा यांचा पराभव केला. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र मतदारांनी सवरा यांना झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना व भाजप प्रत्येकी सहा जागांवर विजयी झाले असून कॉंग्रेस दोन, ठाकूरांची बहुजन विकास आघाडी एक, रिपब्लिकन पक्ष एक तर राष्ट्रवादी कॉंग्रेस एका जागेवर विजयी झाले. 

सवरा हे गेल्या अनेक वर्षापासून आमदार आहेत. त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून ते मंत्रीही आहेत तरी विकास कामे ज्या तुलनेत व्हायला हवा होता तो झाला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. या नाराजीचा फटका सवरा यांच्या कन्येला बसला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेने भाजपशी युती न करता स्वबळावर निवडणूक लढविली होती. वाडा हा भाजपचा गड समजला जातो मात्र या गडातच शिवसेनेने बाजी मारली आहे. नगराध्यक्षपद शिवसेनेने खेचून आणले आहे. या निकालानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com