हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची सेहवागची तयारी 

ट्विटरवर साडे अठरा लाख फॉलोअर्स असलेल्या सेहवागने शेवटी ही मुले आपल्या इंटरनॅशन स्कूलमध्ये आली तर ते आपले सौभाग्य ठरेल, असे विनम्रतेने म्हंटले आहे .
Sehewag-Virendra
Sehewag-Virendra

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवाग पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या निधनावर केवळ दुःख व्यक्त करून शांत बसलेला नाही . तर हुतात्मा जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी त्याने दाखवली आहे . 

जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर करण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 44 जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली.  या घटनेचा देशभरातून निषेध होत आहे. शासनातर्फे हुतात्मा जवानाच्या कुटुंबियांना मदतही जाहीर होते आहे . पण वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांवर तर आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती आहे . त्यामुळे अशा जवानांच्या आप्तेष्ठांच्या दुःखावर फुंकर टाकण्याचे आणि इतरांना प्रेरणा देण्याचे काम सेहवाग याने केले आहे . 

 सेहवाग इंटरनॅशन स्कूलमध्ये या सर्व मुलांना मोफत शिक्षण देण्याची तयारी त्याने आज ट्विट करून दर्शविली आहे . सेहवाग  ट्विटमध्ये म्हणतो,  ''आपल्यासाठी हुतात्मा झालेल्या जवानांसाठी कितीही केले तरी कमीच आहे. त्यामुळेच त्यांच्या  मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी उचलायला तयार आहे . झज्जर येथील   सेहवाग इंटरनॅशन स्कूलमध्ये त्यांची संपूर्ण काळजी घेतली जाईल ."

ट्विटरवर साडे अठरा लाख फॉलोअर्स असलेल्या सेहवागने शेवटी  ही मुले आपल्या  इंटरनॅशन स्कूलमध्ये आली तर ते आपले सौभाग्य ठरेल, असे विनम्रतेने  म्हंटले आहे . हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सेहवाग याने ट्विटरवर सुधार जाओ वरना सुधार देंगे असा हॅशटॅग पाकिस्तानला उद्देशून वापरला होता . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com