`ईव्हीएम'मध्ये फेरफार केल्याची शंका : आमदार हितेंद्र ठाकूर

ईव्हीएममध्ये रविवारी रात्री उशिरा फेरफार करण्यात आला असावा, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
`ईव्हीएम'मध्ये फेरफार केल्याची शंका : आमदार हितेंद्र ठाकूर

विरार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानादरम्यान सोमवारी (ता. 28) तब्बल 283 ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांत बिघाड झाला. त्यामुळे रखडपट्टी झाल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. दरम्यान, ईव्हीएममध्ये रविवारी रात्री उशिरा फेरफार करण्यात आला असावा, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 

वसई तालुक्‍यातील सायवन, विरार, नालासोपारा, नाळा, फादरवाडी, मर्देस, दिवाणमान, सोपारा, विरार पूर्व, फुलपाडा येथील मतदान केंद्रांवर सकाळीच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे आढळले. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. काल रात्री उशिरा मतदान यंत्रांच्या सेटिंगमध्ये फेरफार करण्यात आला असावा, असा संशय बविआचे प्रमुख आमदार हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला. 

अभियंत्यांसोबत तहसीलदार फिरत होते, असा आरोप त्यांनी केला. पालघर पोटनिवडणुकीत साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करा, असे सांगणारे मुख्यमंत्री रडीचा डाव खेळत आहेत. 

बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून ईव्हीएम बंद पाडण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com