व्हायरल सत्य : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास कंपनीकडून मिळते नुकसानभरपाई

शहरी भागात सगळ्यांच्याच घरात गॅस असतो...आता ग्रामीण भागातही गॅस मोठ्या प्रमाणात वापरला जातो...त्यामुळं हा विषय सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे...अनेकदा सिलिंडर लिक होऊन पेटही घेतो...त्यामुळं घराची मोठी हानी होते...अशा अनेक घटना आपण पाहिल्यात...पण, सिलिंडरचा स्फोट होऊन नुकसान झाली तर त्याची भरपाई मिळते हे तुम्हाला माहित आहे का...?
व्हायरल सत्य : गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास कंपनीकडून मिळते नुकसानभरपाई

मुंबई : गॅसचा स्फोट झाल्यास कंपनी 40 ते 50 लाखांची नुकसान भरपाई देते हे तुम्ही कधी ऐकलंय का...? गॅस कंपन्या सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्याची नुकसान भरपाई देते अशा आशयाचा मेसेज व्हायरल होतोय...हा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली...मग काय सत्य समोर आलं पाहा...

हा मेसेज वाचल्यावर काही प्रश्न आले ते असे....
♦गॅस सिलिंडरचा असतो 50 लाखांचा विमा ?
♦सिलिंडरचा स्फोट झाल्यास मिळते भरपाई?
♦काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य ?

शहरी भागात सगळ्यांच्याच घरात गॅस असतो...आता ग्रामीण भागातही गॅस मोठ्या प्रमाणात वापरला जातो...त्यामुळं हा विषय सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे...अनेकदा सिलिंडर लिक होऊन पेटही घेतो...त्यामुळं घराची मोठी हानी होते...अशा अनेक घटना आपण पाहिल्यात...पण, सिलिंडरचा स्फोट होऊन नुकसान झाली तर त्याची भरपाई मिळते हे तुम्हाला माहित आहे का...? कदाचित नसेलही, पण 40 ते 50 लाखांपर्यंत नुकसान भरपाई मिळते असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...हे खरं आहे का..? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...आता व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा... 

गॅस सिलिंडरचा विमा असतो हे तुम्हाला माहित आहे का ? स्वयंपाकाच्या गॅसचा आपल्या घरात स्फोट झाला तर विमा कंपनीकडून ग्राहकाला 40 ते 50 लाख रूपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळू शकते. प्रसंग ओढावलाच तर गॅस कंपनीकडे विमा मागायला विसरू नका

हा मेसेज व्हायरल करून त्याखाली फोन नंबरही देण्यात आलाय...हा विषय सगळ्यांच्याच गरजेचा असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...याची माहिती गॅस वितरक देऊ शकतात...त्यामुळं आमचे प्रतिनिधी गोपाल मोटघरे हे ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रीब्युटर फेडरेशनच्या अध्यक्षा उषा पुनावाला यांना भेटले...त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि सिलेंडरचा स्फोट होऊन नुकसान झाल्यास 40 ते 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते का हे जाणून घेतलं... नुकसान झाल्यास भरपाई मिळते हे त्यांच्याकडून स्पष्ट झालं...पण, एल.पी.जी. गॅस सिलेंडरची 'एक्सपायरी डेट' असते आणि ती एक्सपायरी डेट संपलीय हे कसं ओळखायचं...? हा सगळ्यांच्याच जीवाचा प्रश्न असल्यानं एक्सपायरी कशी ओळखायची हे आम्ही गॅस सेफ इंडिया डीलरकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला...
 
त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...
►सरकारी कंपन्यांच्या गॅसचा स्फोट झाल्यास नुकसान भरपाई मिळते
►40 ते 50 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते
►वैधता संपलेले सिलिंडर कंपनी ग्राहकांना देत नाही
►एक्सपायरी डेट सिलिंडरवर कोडवर्डमध्ये लिहिलेली असते
►सेफ्टी डिवाईस लावूनही दुर्घटना झाल्यास इन्शुरन्स कंपनीकडून 75 लाख ते 5 कोटींची भरपाई मिळते

थोडक्यातसिलिंडरचा स्फोट झाल्यास नुकसान भरपाई गॅस कंपनी देते हे स्पष्ट झालं...त्यामुळं दुर्दैवानं अशी घटना कुठे घडली तर कंपनीकडे नुकसान भरपाई मागायला विसरू नका...त्यामुळं आमच्या पडताळणीत सरकारी गॅस कंपनी नुकसान पाहून 40 ते 50 लाख रुपयांची भरपाई देते हा दावा सत्य ठरला...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com