VIP's hasselfree travel | Sarkarnama

व्हीआयपींचा हवाई प्रवास होणार सुखकारक 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 5 मे 2017

मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ सनदी अधिकारी आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींचा प्रवास यापुढे वेळेवर आणि सुखकारक होणार आहे. 

मुंबई : मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, वरिष्ठ सनदी अधिकारी आदी अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींचा प्रवास यापुढे वेळेवर आणि सुखकारक होणार आहे. 

सरकारच्या मालकीची विमाने, हेलिकॉप्टर उपलब्ध झाली नाही तर वेळेवर प्रवास करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील एव्हिएशन एजन्सीची नियुक्‍ती व हवाई सेवेचे दर निश्‍चित करण्यासाठी ई- निविदा पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. यानुसार हवाई सेवेचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. 

महत्त्वाच्या बैठका, नैसर्गिक आपत्तीत काही ठराविक ठिकाणास ताबडतोब भेट, तसेच सरकारी कार्यक्रमास राज्यातील वेगवेगळ्या भागात उपस्थिती आदींसाठी हवाई सेवेची गरज भासते. मात्र सरकारच्या मालकीचे विमान, हेलिकॉप्टर जर उपलब्ध झाले नाही तर इतर पर्याय स्वीकारावा लागतो. या अडचणीतून तोडगा काढण्यासाठी खासगी सेवेचा लाभ घेण्याचा सरकारचा विचार होता. त्यानुसार ई-निविदेच्या माध्यमातून मे. ऍडोनीस एव्हिएशन एन्टरप्रायजेस व मे. ऍलॉफ्ट एव्हिएशन प्रा. लि. या दोन पुरवठादारांकडून सेवा घेण्यात येणार आहे. यासाठीच्या दराचे कोष्टक ही तयार करण्यात आले आहे.याबाबत सामान्य प्रशासन विभागाने निर्णय केला आहे.  
 

संबंधित लेख