Vinod Tawde is facing difficult path : Kaptl Patil | Sarkarnama

विनोद तावडे यांचा विधानसभेचा रस्ता कठीण :  कपिल पाटील

सरकारनामा
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

.

मुंबई  :  शिक्षण क्षेत्रातील एकही प्रश्‍न न सोडविणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा यंदा विधानसभा निवडणुकीचा रस्ता कठीण  असल्याची टीका  शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केली आहे . 

शिक्षण क्षेत्रातील अन्यायाच्या विरोधात दादर ते परळ दरम्यान मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर पाटील बोलत होते.

परळच्या कामगार मैदानातील सभेला संबोधित करताना कपिल पाटील म्हणाले, " समान काम, समान वेतन, समान पेन्शन, सन्मान याची हमी संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली आहे; पण या सरकारला हे मंजूर नाही. या मागण्यांसाठी भांडावे लागते, ही शोकांतिका आहे. "

"लबाड सरकारने गेली साडेचार वर्षे शिक्षण क्षेत्रावर अन्यायाचा वरवंटा फिरवला आहे. न्यायासाठी आरडाओरडा करणाऱ्यांना हे सरकार देशद्रोही ठरवते. जनजागृती करणाऱ्यांना देशविरोधी घोषित करते. शाळा बंद करणे, अभ्यासक्रम बदलणे हा या सरकारचा अजेंडा आहे. शिक्षकांना छळणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पुढच्या विधानसभेचा रस्ता कठीण आहे. या सरकारचे अच्छे दिन जानेवाले है, अपने दिन आनेवाले है,'' असे पाटील म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख