vinod tawade write letter to sangli corporatores | Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचा विजय मोदी-शहांमुळे; तावडेंचा 'विनोद'! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कार्याची दिशा असल्याचा शोध शालेय शिक्षण व उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लावला आहे.

सांगलीः सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कार्याची दिशा असल्याचा शोध शालेय शिक्षण व उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लावला आहे.

खुद्द तावडे यांनी या नगरसेवकांना अभिनंदनाचे पत्र पाठवून दोन्ही कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या विजयाचे गुपित त्यांनाच सांगितले आहे. तावडेंचा हा "विनोद' पालिका वर्तुळात सर्व एजॉंय करीत आहेत. 

श्री तावडे यांनी पालिकेतील सर्वच सदस्यांना अभिनंदन पात्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व नगरसेवकांचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास कार्याची आणि संघटन कौशल्याची योग्य दिशा आहे. त्यामुळेच हा विजय संपादन झाला. घोटाळा इतकाच की हे पत्र फक्त भाजपच्या नगरसेवकांसाठी पाठवायला हवे होते. मात्र ते पत्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनाही पाठवण्यात आले आहे. तावडेंच्या शिक्षण विभागातील अनेक आदेशांमधील "विनोदांची नेहमीच चर्चा होत असते. त्याचा अनुभव पालिका सदस्यांनाही आला. पत्रात ते पुढे म्हणतात," आपण जनतेच्या केलेल्या सेवेची, कार्याची पोचपावती या विजयाच्या स्वरूपात मिळालेली आहे. आपले कर्तृत्व आणि कार्य यांच्या बळावर जनतेने आपल्याला या पदाची जबाबदारी सोपवली आहे. '' या पत्रावर तावडेंची स्वाक्षरी आहे. 

संबंधित लेख