vinod tawade maratha reservation attack apposition | Sarkarnama

मराठा आंदोलनाला काही मराठा नेत्यांनी बदनाम केले, तावडेंचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई : आरक्षणासाठी राज्यात करण्यात आलेले मराठा आंदोलन काही मराठा नेत्यांनी बदनाम केल्याचा आरोप विनोद तावडे यांनी आज केला. मात्र ते नेते कोण हे त्यांनी स्पष्ट केले नाही. 

एकीकडे विरोधक मराठा आंदोलन चिघळण्यास राज्य सरकारला जबाबदार धरत असताना, आता मंत्रीही विरोधकांकडे बोट दाखवताना दिसत आहेत. सरकारच्या मराठा उपसमित तावडे आहेत. आता आंदोलनानंतर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. 

मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तावडे म्हणाले, "" मराठा आंदोलनाला नेमके कुणी बदनाम केले, हे आता पोलिसांना समजले आहे. आपण त्या वेळी मराठा समाजाला काही देऊ शकलो नाही. त्याचे कदाचित काही नेत्यांना वाईट वाटले असावे, त्यामुळे काही मराठा नेत्यांनी आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे आता हळूहळू समोर येत आहे. मात्र, आमचे सरकार हे मराठ्यांना आरक्षण देणार आणि तेही न्यायालयात टिकणारे असेल.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख