बड्या क्‍लासेसची तावडेंनी सुपारी घेतली आहे - डॉ. जितेंद्र आव्हाड 

बड्या क्‍लासेसची तावडेंनी सुपारी घेतली आहे - डॉ. जितेंद्र आव्हाड 

मुंबई : समाजात पुन्हा विषमता आणायची आणि वर्णव्यवस्था प्रस्थापित करायची यासाठी भाजपा सरकार प्रत्येक प्रयत्न आहे. घरातल्या घरात शिकवण्या घेणाऱ्यांना सरकारकडे नोंदणी आवश्‍यक करणे, तसेच आयकर, जीएसटी लागू करण्याच्या प्रस्तावाचा मसुदा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तयार केला आहे. विषमता आणि वर्णव्यवस्था आणायचा तो एक बिलंदर प्रयत्न आहे हे मी विनोदाने नाही तर अतिशय गंभीरपणे सांगतो, असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडेंवर आज हल्लाबोल केला. 

महेश ट्युटोरियल किंवा तत्सम बड्या क्‍लासेसची, तावडे यांनी घेतलेली ही सुपारी आहे, असा आरोप करताना तावडे महेश ट्युटोरियलचे विद्यार्थी होते काय ? असा सवालही आव्हाड यांनी केला. 

सरकारनामाशी बोलताना आव्हाड म्हणाले, " शालेय मुलांच्या घरबसल्या शिकवण्या घेणाऱ्यामध्ये बहुसंख्य महिला आहेत. आपल्या शिक्षणाला साजेशी किंवा घराच्या जवळपास नोकरी मिळत नाही, अथवा बाळंतपणानंतर आपल्या मुलावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नोकरी सोडलेल्या महिला यात प्रामुख्याने आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित आहेत. घरातच काम करून संसाराला चार पैशांचा हातभार लागावा हा या महिलांचा हेतू असतो. निवृत्तीनंतर आयुष्यात अचानक रितेपणा येतो. किंवा पेन्शनमधे भागत नाही म्हणूनही अनेक स्त्रिया हा व्यवसाय करतात. कोण असतात त्यांचे विद्यार्थी ? एखाद्या विषयात कच्ची असलेली, शाळेतल्या सुमार दर्जाच्या शिक्षणामुळे पालकांची चिंता बनलेली, कनिष्ठ किंवा मध्यमवर्गीय घरातली मुलं; ज्यांना महागड्या कोचिंग क्‍लासेसची फी परवडत नाही. चारदोन मुलांच्या शिकवण्या घेणाऱ्या या महिलांचं उत्पन्न लाखो रुपयांत नसतं. किंबहुना, हे एक ज्ञानदानाचं काम आहे. कराची कुऱ्हाड आता त्यांच्यावरही घालायला सरकार निघालं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या वारशावर आजही केली जात असलेली ही चिखलफेक असल्याची टीका आव्हाड यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com