vinod tawade-ajit pawar, assembly question | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

तावडे, तुम्ही कॅबिनेटमध्ये झोपा काढता का ? 

गोविंद तुपे 
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई ः या सभागृहात सर्व 288 आमदार लोकांच्या मतांच्या जीवावर इथे बसले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा कसली करताय निर्णय घ्या अशी ठोस भूमिका माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात मांडली. मराठा आरक्षणाबाबत याच सभागृहात सर्वानुमताने पारीत झालेले विधेयकाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे याची आपल्याला कल्पना नाही का ? असा संतप्त सवाल मंत्री विनोद तावडे यांनी विचारताच पवारांचाही पारा चढला आणि ते तावडेंना म्हणाले,"" तुम्ही कॅबिनेट मध्ये काय झोपा काढता का ? 

मराठा आरक्षणाबाबत एक ओळीचा सर्वानुमते ठराव करून आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून होत आहे. लाखोंच्या संख्येने लोक याठिकाणी मोर्चात जमले आहेत. लहान-लहान मुली, तरूण पोटतिडकीने आपली भूमिका मांडत आहेत. मात्र सरकार त्यावर कुठलाही तात्काळ तोडगा काढत नाही. त्यांच्या भावनांचा अंत पाहू नका अशी भूमिका अजित पवार यांनी सभागृहात मांडली. 

पवारांच्या आक्रमक भूमिकेला तावडे यांनीही त्याच स्टाईलने उत्तर देत विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत पारीत झालेल्या विधेयकाला न्यायालायात आव्हान देण्यात आले आहे. एवढी साधी गोष्टही तुम्हाला माहित नाही का, त्यामुळे कसला ठराव सांगता आहात असे ही तावडे म्हणाले. त्यावर संतापलेल्या अजितदादांनी तावडेंनाही खडे बोल सुनावत तुम्ही कॅबिनेटमध्ये काय झोपा काढता का असा प्रति प्रश्न करताच अध्यक्षांनी सभागृह तहकूब करण्याच्या तयारीत होते. मात्र तितक्‍यात मुख्यमंत्री सभागृहात आले आणि या वादावर पडदा टाकला. 

संबंधित लेख