vinod tawade about opposition | Sarkarnama

विरोधी पक्ष सभागृहाबाहेर मराठ्यांना OBC आरक्षण मागतोय आणि आत विरोध करतोय! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

सरकार योग्य पद्धतीने काम करत असल्याचे तावडे म्हणाले. 

पुणे : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत मराठा आरक्षणावरुन विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, अशी मानसिकता कॉंग्रेस- राष्ट्रवादीची भूमिका असल्याची टीका त्यांनी केली. 

मराठा आरक्षणाचा अहवाल पटलावर मांडण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. त्यावर विनोद तावडे म्हणाले, विरोधी पक्षनेते आणि त्यांना पाठिंबा देणारा विरोधी पक्ष मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सभागृहाबाहेर ते मराठ्यांना ओबीसींतर्गत स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण देण्याची मागणी करत आहेत. आत येवून ओबीसींना धक्‍का लावू नका, असे सांगत आहेत. अहवाल पटलावर ठेवा, असे म्हणत आहेत. त्यांनी न्यायालयात जाण्यासाठी वकिलांची फौज तयार ठेवली आहे, मात्र सरकार योग्य पद्धतीने काम करत असल्याचे तावडे म्हणाले. 

संबंधित लेख