vinod tavade-kapil patil, mumbai | Sarkarnama

कपिल पाटील-विनोद तावडेंमध्ये यांच्यात जुंपली 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 6 जुलै 2017

मुंबई : मुंबईतील शिक्षकांच्या वेतनाचे खाते राष्ट्रीय बॅंकेतून काढून मुंबई बॅंकेत नव्याने काढण्याच्या वादात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि आमदार कपिल पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 

मुंबई : मुंबईतील शिक्षकांच्या वेतनाचे खाते राष्ट्रीय बॅंकेतून काढून मुंबई बॅंकेत नव्याने काढण्याच्या वादात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि आमदार कपिल पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे. 

पाटील यांनी तावडे यांच्या विरोधात रस्त्यावर लढाई सुरू केली असल्याने शेकडो शिक्षकांनीही पाटील यांच्या लढाईला पाठबळ दिले आहे. यामुळे आपल्या बॅंकेत सर्व शिक्षक खाते खोलतील आणि त्याचा चांगला लाभ आपल्याला मिळेल या भ्रमात असलेल्या मुंबई बॅंकेचेही धाबे दणाणले आहे. मुंबईतील शिक्षकांपैकी आतापर्यंत केवळत 1400 शिक्षकांनीच मुंबई बॅंकेत खाते उघडले असून उर्वरित तब्बल 27000 शिक्षकांची आपले खाते उघडण्यास ठाम विरोध दर्शविला असून यामुळे चार आठवड्यापासून सुरू झालेला तावडे-पाटील वाद आता चांगलाच रंगला आहे. 

या वादात मुंबई बॅंकेची मोठी गोची झाली असून आपल्या बॅंकेत शिक्षकांनी खाते उघडावे यासाठी बॅंकेतील अनेक अधिकारी मुंबईतील शाळा-संस्थाचालकांना गळ लावत फिरत असले तरी त्यांना शिक्षक दाद देत नसल्याची माहिती शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी 'सरकारनामा' बोलताना दिली. 
शिक्षकांना राष्ट्रीय बॅंकेतून काढून सहकारी स्तरावर आलेल्या आणि अगोदरच आर्थिक व्यवहारासाठी वादात सापडलेल्या मुंबई बॅंकेत खाते काढण्याची कोणतीही गरज नव्हती. परंतु केवळ कोणाच्या तरी लाभासाठी हजारो शिक्षकांना वेठीस धरण्याचा उदयोग शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि त्यांचे सचिव नंदकुमार करत असून यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संताप असल्याचेही सरोदे म्हणाले. 

तावडे यांनी मुंबई बॅंकेत खाते उघडण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी त्यांच्या मतदार संघासोबतच आझाद मैदान आदी ठिकाणी आंदोलने झाली असून यापुढे ही आंदोलने अधिक तीव्र केली जाणार असल्याचा इशाराही सरोदे यांनी दिला.  
 

संबंधित लेख