vinod tavade education minister | Sarkarnama

तावडेंवर "विश्वासघाताचा आरोप ; शिक्षण संघर्ष संघटनेतर्फे सामुहिक मुंडन आंदोलन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई : विद्यमान शिक्षणमंत्री विनोद तावडे हे विरोधी पक्षनेते असताना शिक्षकांच्या पेन्शन योजनेसाठी रान माजवत होते, शासनाला हक्कभंग केलेल्याची नोटिसा देत होते, सभात्याग करत होते. परंतु आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आमची आर्त हाक ऐकू येत नाही. त्यांनी आमचा विश्वासघात केला असून ते खोटारडेही आहेत, असा आरोप शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे पदाधिकारी व शिक्षण क्षेत्रातील मंडळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधण्याकरिता बुधवारी सामुहिक मुंडन आंदोलन करणार आहेत. 

नवीन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करताना राज्यशासनाने त्यात अनेक चुका केल्या आहेत. आता ही चूक राज्यशासनाचा शालेय विभाग मान्य करण्यास तयार नाही. त्यामुळे झालेल्या चुकांची जबाबदारी अर्थविभागावर टाकून तावडे यांनी या सगळ्यांतून काढता पाय घेतला आहे, अशी टीकाही शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. 

1995-96 पासून शिक्षकी सेवेत काम करणाऱ्यांना फक्त 1 नोव्हेंबर 2005 ला शाळा 100 टक्के अनुदानावर आल्या नाही म्हणून जुन्या पेन्शन पासून वंचित ठेवले. ही बाब तावडे यांनी ते विरोधी पक्षनेता असताना सभागृहामध्ये मांडली होती. परंतु तावडे हे शिक्षण खात्याचे मंत्री असून सुद्धा त्याच मुद्याला बगल देत आहेत. वेळोवेळी निवेदन, मोर्चे, निषेध करून सुद्धा आमच्यावरचा अन्याय दुर करण्याचा प्रयत्न तावडे यांनी केला नाही, असा आरोपही शिंदे यांनी केला. 

महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर होणाऱ्या मुंडन आंदोलनात सहभागी होऊन स्वतःचे मुंडन करून आपले केस शासनास देणार असल्याचेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

संबंधित लेख