vinod tavade | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उद्धव ठाकरेंनी उद्या 288 विधानसभा क्षेत्राच्या संपर्कप्रमुखांची बोलावली तातडीने बैठक
धनगर आरक्षणासाठी विधान भवनाच्या गेटवर यशवंत सेनेच आंदोलन

"भ्रष्टाचार विरोधातील लढाई म्हणजे ऑनलाइन व्यवहार'

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुंबई : देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. देशातील वर्षोनवर्षे चालणारा भ्रष्ट कारभार रोखण्यासाठी मोदी यांनी सर्व व्यवहार ऑनलाइन आणि कॅशलेस पध्दतीने सुरू केले. देशातील भ्रष्टाचार थांबविण्याचा हा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधातील ही लढाई म्हणजे ऑनलाइन व्यवहाराची सुरुवात आहे, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. 

केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्यावतीने देशभरात सुरू करण्यात आलेल्या 100 दिवसांच्या डिजीधन मेळाव्याचा समारोप काल (शुक्रवारी) तावडे यांच्या उपस्थितीत वांद्रे पूर्व येथील चेतना महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, जिल्हाधिकारी जितेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते. 

तावडे म्हणाले, की देशातील काळे व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या उद्देशाने डिजिटल पेमेंट ही योजना सुरू करण्यात आली असून, सामान्य माणसाला त्याचा फायदा मिळत आहे. डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाचे व्यवहार हे अधिक सुरक्षित आणि पारदर्शक ठरणार आहेत. डिजिटल व्यवहार ही अतिशय पारदर्शी यंत्रणा असून त्याचा फायदा प्रत्येक नागरिकाने घेतला पाहिजे. 

संबंधित लेख