vinod khanna | Sarkarnama

खासदार व ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे मुंबईत निधन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते व भाजपचे खासदार विनोद खन्ना यांचं आज मुंबईतील गिरगाव भागातील एका रुग्णालयात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. विनोद खन्ना हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतरही त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) मध्ये 6ऑक्‍टोबर 1946 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी कविता खन्ना, पुत्र राहुल, अक्षय आणि दोन मुली असा परिवार आहे. "मनके मित' या सुनील दत्त यांच्या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेते व भाजपचे खासदार विनोद खन्ना यांचं आज मुंबईतील गिरगाव भागातील एका रुग्णालयात निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. विनोद खन्ना हे गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतरही त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान) मध्ये 6ऑक्‍टोबर 1946 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी कविता खन्ना, पुत्र राहुल, अक्षय आणि दोन मुली असा परिवार आहे. "मनके मित' या सुनील दत्त यांच्या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट एका तमीळ चित्रपटाचा रीमेक होता. 

त्यांनी मेरा गाव मेरा देश, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अन्थोनी, लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, जुर्म आदींसह शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी 1982 मध्ये अचानक बॉलिवूडला रामराम करून आचार्य आशो रजनीश यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर पाच वर्षांनी पुन्हा चित्रपटक्षेत्राकडे वळले. गेल्या काही महिन्यापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. काही दिवसापूर्वी त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. त्यांच्या निधनाबाबत अफवाही पसरल्या. शेवटी आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबाबत चित्रपटक्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले जात आहे.भाजप खासदार म्हणून पंजाबमधील गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

संबंधित लेख