vinayak raut shryu river mahaarti | Sarkarnama

दिग्वीजयसिंहांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध खोटे ठरोत हीच देवाकडे प्रार्थना : विनायक राऊत 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

रत्नागिरी : अयोध्येतील राम मंदिरप्रश्‍नी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकर हे उत्तर प्रदेशातील शरयू नदीवर येत्या 24 नोव्हेबरला आरती करणार आहेत. या आरतीच्या वेळी शिवसेना राज्यभर महाआरती करणार आहे अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजयसिंह यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध खोटे ठरोत ही देवाकडे प्रार्थना असल्याचे ते म्हणाले. 

राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्‍यात शिवसेना महाआरती करणार असल्याची माहिती राऊत यांनी रत्नागिरीत दिली. ते म्हणाले, की महाआरतीच्या माध्यमातून राम मंदिराचा प्रश्न किती ज्वलंत हे शिवसेना दाखविणार आहे. 

दिग्विजय सिंह यांचे नक्षलीवाद्यांशी संबंध असतील तर हे दुर्दैवी आहे. देशाच्या स्वायत्तेला धोका निर्माण करणारे आहे असे ते म्हणाले, 

संबंधित लेख