vinayak raut shivsena | Sarkarnama

शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी भंपकपणा केला - खासदार विनायक राऊत

ब्रह्मा चट्टे
रविवार, 4 जून 2017

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली, त्यातही काही शेतकरी नेत्यांना टाळून ही चर्चा करण्यात आली. सर्व शेतकरी झोपले असताना संप संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांमध्ये दुही माजवण्याचे काम केले आहे. शेतकरी संपाबाबत मुख्यमंत्र्यांनी भंपकपणा केला असल्याची संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत यांनी दिली. 

सरकारनामाशी बोलताना विनायक राऊत म्हणाले, मुख्यमंत्री काहीही झाले की मोजक्‍याच लोकांना बोलावून घेत चर्चा करतात. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय न करता इथे समिती नियुक्त करू तिथे समिती नियुक्ती करू आणि समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ असा भंपकपणा केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा तोडगा नाकारलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा दुही माजविण्याचा प्रकार केला असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र बंदबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राऊत म्हणाले, शिवसेनेचा उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा असून शिवसेनेचे कार्यकर्ते सक्रियपणे बंदमध्ये सहभाग घेत शिवसेना स्टाईलने आंदोलन करतील.

शेतकऱ्यांच्या सोबत शिवसेना नेहमी असते. आमचे शिवसैनिकही शेतकरीच आहेत. त्यामुळे शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उद्याच्या संपात सहभागी होणार आहेत. फक्त अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व सेवा बंदला शिवसेनेचा पाठिंबा राहणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला आता भाजप वगळता शेतकरी संघटनेसह सर्वच राजकीय पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या संपाला हिंसक वळण मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन समितीच्या शिफारसींनुसार शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना पेन्शन आदी मागण्याकरता 1 जूनपासून संप पुकारला आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यात 5 जून रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख