दोन राणे हजर; खासदार विनायक राऊत गैरहजर

दोन राणे हजर; खासदार विनायक राऊत गैरहजर

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद आता नव्या वळणावर गेल्याने शिवसेना कार्यकर्ते विविध ठिकाणी आक्रमक झाली आहे. त्याचे पडसाद सिंधुदुर्गात पडले असून शिवसेना खासदार विनायक राऊत हे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला आज गैरहजर राहिले. 

सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नारायण राणे, नितेश राणे, वैभव नाईक आदी या वेळी उपस्थित होते. खासदार राऊत यांचीही नियोजन बैठकिला विशेष उपस्थि असते. मात्र राऊत या वेळी फिरकले नाहीत.

माजी खासदार नीलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी टीका केली होती. त्यातून सेना कार्यकर्ते राणे यांच्यावर अधिकच चिडले आहेत. निलेश हे राऊत यांच्याबद्दलही अनेक वेळा खालच्या पातळीवर जाऊन बोलले आहेत. त्याचीच खंत मनात ठेवून राऊत हे नियोजन सभेला  उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले.

राणे आणि राऊत हा वाद निवडणुकी आधीपासून उफाळला आहे. नीलेश राणे यांनी "विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही' असा पण केला आहे. या पार्श्‍वभूमीवर विनायक राऊत यांनीही  नीलेश राणे यांनी दाढीबरोबर केसही वाढवावेत. त्याचा उपयोग त्यांना बुवाबाजीसाठी होईल. 2019 ला मी असो की अन्य शिवसेनेचा उमेदवार नीलेश राणेंचा अडीच लाखाने पराभव करेल, असा दावा केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com