vinayak nimhan want to leave shivsena post | Sarkarnama

विनायक निम्हण शहरप्रमुख पदाला "जय महाराष्ट्र' करणार! 

मंगेश कोळपकर 
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पुणे : "शहर प्रमुखाचे काम दैनंदिन स्वरूपाचे आहे. त्यासाठी पूर्णवेळ शहर प्रमुख नियुक्त करावा. सच्चा शिवसैनिक म्हणून मी त्यांना कायमच साथ देईल,' असे म्हणत शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी शहरप्रमुख पदाला "जय महाराष्ट्र' करण्याचे सूतोवाच पक्षाकडे केले आहे. त्यामुळे शिवसेनेने नव्या शहर प्रमुखाचा शोध सुरू केला आहे. 

पुणे : "शहर प्रमुखाचे काम दैनंदिन स्वरूपाचे आहे. त्यासाठी पूर्णवेळ शहर प्रमुख नियुक्त करावा. सच्चा शिवसैनिक म्हणून मी त्यांना कायमच साथ देईल,' असे म्हणत शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी शहरप्रमुख पदाला "जय महाराष्ट्र' करण्याचे सूतोवाच पक्षाकडे केले आहे. त्यामुळे शिवसेनेने नव्या शहर प्रमुखाचा शोध सुरू केला आहे. 

कॉंग्रेसमधून परतल्यावर निम्हण यांची सुमारे अडीच वर्षांपूर्वी शहर प्रमुख पदावर नियुक्ती झाली. महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी उत्साहाने तयारी केली. यंदा प्रथमच शिवसेनेने महापालिकेच्या सर्व म्हणजे 162 जागांवर उमेदवार उभे करण्यात यश मिळविले. दहा ठिकाणी उमेदवार निवडून आले तरी, 11 उमेदवार 50 ते 500 मतांच्या फरकाने पराभूत झाले. कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांच्या तुलनेत शिवसेनेने अस्तित्त्व कायम राखले आहे. निम्हण यांनी शहर प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यावर युवा सेना, महिला आघाडी सबळ केली. संघटनेत जान ओतण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी आंदोलनांचा धडाका लावला. प्रभाग-प्रभागात बैठका घेऊन कार्यकर्त्यांना सक्रिय केले, संघटनेत जान आणली. पण... महापालिका निवडणुकीचा निकाल त्यांच्यासाठी अनपेक्षित ठरला. आता काही काळ व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी शहर प्रमुखाच्या जबाबदारीतून सध्या बाजूला काढण्याची विनंती पक्षाला केली आहे. 

पक्षाच्या मुंबईतील श्रेष्ठींनीही चाचपणी सुरू केली असून काहीजणांना विचारणाही झाली आहे. मात्र, शहर प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांनी तयारी दाखविली नाही. त्यामुळे पुढच्या काळात चार शहर संघटक नियुक्त करून पक्षाच्या कारभाराचा गाडा शहरात हाकला जाईल, अशी चिन्हे आहेत. 

राज्यातील सत्तेत सहभागी होऊन शिवसेनेला सुमारे अडीच वर्षे लोटली आहेत. परंतु, सत्तेची पदे पुण्यातील कार्यकर्त्यांपासून दूरच राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या फार मोठ्या पदांच्या अपेक्षा नव्हत्या. परंतु, एरवी किरकोळ वाटणारीही पदे पुण्यातील शिवसैनिकांच्या वाट्याला आलेली नाहीत. काहीजणांना पक्षाने "शब्द' दिला होता. परंतु, त्याची वचनपूर्ती झाली नाही. महामंडळांपासून विशेष समित्यांपासूनही कार्यकर्त्यांना वंचित ठेवण्यात आले. तुलनेने भारतीय जनता पक्षाने शक्‍य तेथे कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. शिवसेनेलाही काही पदे मिळाली परंतु, त्यांचे वाटप मुंबईत झाले. त्यामुळे पक्ष म्हणजे केवळ मुंबईतील संघटना आहे का, असा प्रश्‍न काही शिवसैनिकांनी "सकाळ'शी खासगीत बोलताना उपस्थित केला. पक्षातील बिनीच्या शिलेदारांनाही काही नेत्यांनी हेतूतः दूर ठेवले. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून आगामी काळात ती दूर करण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. 

संबंधित लेख