vinayak mete akola | Sarkarnama

भाजपच्या नेत्यांनीच फडणवीसांचा विश्वासघात केला : विनायक मेटे 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 जुलै 2017

 

 

अकोला : विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महायुतीचा घटकपक्ष म्हणून शिवसंग्रामचे संदीप पाटील यांना बाळापूर मतदार संघातून उमेदवारी मिळाली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एबी फॉर्मवर खोडतोड करून त्यांच्याच पदाधिकाऱ्यांचे नाव टाकले. या नेत्यांनी घटक पक्ष म्हणून आमचाच नव्हे तर तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांचा विश्वासघात केल्याचा हल्लाबोल शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी अकोल्यात केला आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीत महायुती होवो वा न होवो बाळापुर मतदारसंघात शिवसंग्राम लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली 

संबंधित लेख