vinay kore meeting with nitin gadkari | Sarkarnama

दिल्लीत आलेल्या विनय कोरेंना गडकरींनी स्वतःच्या अंगावरचा कोट दिला!

संपत मोरे 
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

कोरे 'नको' म्हणत असताना त्यांनी आग्रहाने त्यांना अंगात कोट घालायला लावला.  

पुणे : माजी मंत्री आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे काही कामानिमित्ताने दिल्लीला गेले आहेत. यादरम्यान त्यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. 

गडकरी आणि कोरे यांचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. विनय कोरे यांनी आज गडकरी यांची भेट घेतली. त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर निरोप देताना गडकरी यांनी कोरे यांना दिल्लीच्या थंडीची बाधू नये, म्हणून स्वतःच्या अंगावरचा कोट काढून दिला. कोरे 'नको' म्हणत असताना त्यांनी आग्रहाने त्यांना अंगात कोट घालायला लावला.  

संबंधित लेख