Villagers Refused to take body of Sucide Victim at Baglan | Sarkarnama

आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या दिव्यांग शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

दीपक खैरनार
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मंगळवार (ता.२१) रोजी सकाळी अकराच्या सुमारास नैराश्यच्या गर्तेत असलेल्या प्रवीणने गावातील एका शेतक-याच्या विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्याभर खळबळ उडाली आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही विहिरीतील मृतदेह काढू देणार नाही असा आक्रमक पवित्रा कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी घेतला होता. 

अंबासन (नाशिक) : उत्राणे येथील  आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामिण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र, सकाळी गावकरी व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रूग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी ठिय्या आंदोलन छेडले व कुटुंबियांना पंचवीस लाख रूपये, लहान भावाला सरकारी नोकरी व म्हसदी येथील सेंट्रल बॅकेच्या आधिक-यावर कठोर कारवाई होत नाही माघार घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

मंगळवार (ता.२१) रोजी सकाळी अकराच्या सुमारास नैराश्यच्या गर्तेत असलेल्या प्रवीणने गावातील एका शेतक-याच्या विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्याभर खळबळ उडाली आहे. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही विहिरीतील मृतदेह काढू देणार नाही असा आक्रमक पवित्रा कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी घेतला होता. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव व तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी मध्यस्थी करीत नामपुर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. 

सकाळी उत्राणेतील संपूर्ण नातेवाईकांसह, समाजबांधव व महीला रूग्णालयात दाखल होत प्रविणचा मृतदेह ताब्यात घेण्यात नकार देत जोपर्यंत कुटुंबियांना पंचवीस लाखांची मदत, लहान भावास सरकारी व म्हसदी येथील सेंट्रल बॅकेच्या संबंधित आधिका-यावर कठोर कार्यवाही होत नाही. ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला तसेच माझ्या मृत्यूनंतर तरी शासनाने समाजबाधंवाना आरक्षण द्यावे नंतर मृतदेहाला अग्निडाग द्यावा अशी इच्छा मृत प्रविण पगार याने चिठ्ठीद्वारे व्यक्त केली आहे. यावेळी तहसीलदार जितेंद्र कुवर, जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश गुरव व महसुलचे कर्मचारी पहाटेच दाखल झाले आहेत. 

भाजपाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश सावंत यांनी भ्रमणध्वनीमार्फत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डाॅ. सुभाष भामरे यांच्याशी वार्तालाप केला. डाॅ. भामरे यांनी दिल्लीहून मुंबईत तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी विमानाने रवाना झाल्याचे सांगितले. काही वेळापुर्वीच प्रांत प्रवीण महाजन व जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी भेट दिली यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी जायखेडा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 

 

संबंधित लेख