village ban warnig for adhalrao and walase | Sarkarnama

खासदार आढळराव आणि माजी मंत्री वळसे पाटलांना गावबंदी करू : सात गावांचा इशारा

भरत पचंगे
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

शिक्रापूर : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे दोघे आतून एक आहेत. त्यांनी थिटेवाडीच्या पाणी प्रश्नांसदर्भात आम्हाला खेळवू नये. अन्यथा तुम्हा दोघांसह सगळ्याचा पुढाऱ्यांना गावबंदी करू, असा इशारा सात गावांच्या प्रतिनिधींनी आज दिला.

कठीण असे मराठा आरक्षण जे मुख्यमंत्री देवू शकतात तेच मुख्यमंत्री थिटेवाडीचा प्रश्न सोडवू शकतात असा आशावादही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्याने आंबेगावच्या दोन्ही नेत्यांची आता थिटेवाडी पाणी प्रश्नाच्या निमित्ताने चांगलीच परवड होण्याची चिन्हे आहेत. 

शिक्रापूर : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि मजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे दोघे आतून एक आहेत. त्यांनी थिटेवाडीच्या पाणी प्रश्नांसदर्भात आम्हाला खेळवू नये. अन्यथा तुम्हा दोघांसह सगळ्याचा पुढाऱ्यांना गावबंदी करू, असा इशारा सात गावांच्या प्रतिनिधींनी आज दिला.

कठीण असे मराठा आरक्षण जे मुख्यमंत्री देवू शकतात तेच मुख्यमंत्री थिटेवाडीचा प्रश्न सोडवू शकतात असा आशावादही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्याने आंबेगावच्या दोन्ही नेत्यांची आता थिटेवाडी पाणी प्रश्नाच्या निमित्ताने चांगलीच परवड होण्याची चिन्हे आहेत. 

 थिटेवाडी धरणात डिंभे किंवा कळमोडी प्रकल्पातून यावे यासाठी केंदूर ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वी आगामी विधानसभा-लोकसभा निवडणूकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्यावर या भागातील पाबळ, धामारी, कान्हूर-मेसाई (ता.शिरूर) तसेच कन्हेरसर, पूर, वाफगाव (ता.खेड) तालुक्यातील प्रमुख पदाधिका-यांनी केंदूरमध्ये येवून ग्रामस्थांशी बैठक केली. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ जमा झाले होते.

पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव यांनी सांगितले की, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या सुचनेनुसार थिटेवाडीत पाणी यावे यासाठी सर्व्हेक्षण वर्षभरापूर्वीच झाले असून त्यानुसार कळमोडीतून पाणी येवू शकते तर डिंभ्याचे पाणी आणण्यासाठी केवळ १०० कोटीची गरज आहे. या प्रश्नी आंबेगावच्या दोन्ही नेत्यांची आणि एकुणच राज्यकर्त्यांची इच्छा नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला असून या आंदोलनासाठी आता आपण राजकीय पदांचा राजिनामा द्यायची तयारी ठेवायला हवी.

वाफगावचे सरपंच अजय भागवत यांनी सांगितले की, कळमोडी, डिंभे किंवा चासकमानचा पाणी आराखडा तयार झाला असला तरी तो बदलण्यासाठीच लोकप्रतिनिधींना निवडून पाठविलेले आहे. ते काहीच करीत नसतील तर वरील सर्व गावांमध्ये पंचायत समिती सदस्यांपसून आमदार, खासदार, मंत्री आदी सर्वांना गावबंदी करण्य़ाचा निर्णय घेवू.

यावेळी केंदूरचे माजी उपसरपंच युवराज साकोरे यांनी सांगितले की, मतदान बहिष्कार केलाय आता गावबंदी दूर राहिलेली नसून पुढा-यांनी या इशा-याचा योग्य तो बोध घेवून या प्रश्नाचा विचार करावा. या प्रश्नी आता पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार दिलीप वळसे पाटील, बाबुराव पाचर्णे, सुरेश गोरे यांनी एकत्रित बैठक घेण्याची सूचना यावेळी भरत साकोरे यांनी मांडली.

मुख्यमंत्रीच हे करु शकतात!

शिर्डी देवस्थानला सांगून त्या परिसरातील अनेक गावांसाठी निळवंडे प्रकल्पाच्या सिंचन प्रकल्पासाठी ५०० कोटी उपलब्ध करुन देणे आणि राज्यभर कोटींच्या आंदोलनाने कुणाही राज्यकर्त्यांना कठीण वाटत होता तो मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडवू शकतात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थिटेवाडी पाणी प्रश्नही सोडवू शकतात. मुळात केवळ १०० कोटींची गरज असलेला डिंभेच्या कालव्यातून थिटेवाडीत पाणी आणण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांसाठी किरकोळ असून तो ते हमखास सोडवू शकतात आणि त्यादिशेनेच आपण सगळेजण प्रयत्न करू असा निर्धार यावेळी सोपान जाधव यांनी केला.  

कार्यक्रमाला कनेरसर, पूर, वाफगाव, कान्हूर, पाबळ, वरुडे आदी गावचे सरपंच अनुक्रमे सुधीर माशेरे, संपत गावडे, अजय भागवत, दादासाहेब खर्डे, सोपान जाधव, मारुती थिटे आदींसह या गावातील पदाधिकारी, केंदूरचे राजेंद्र ताठे, रामशेठ थिटे, उपसरपंच अभिजित साकोरे, बाबुराव साकोरे, तुकाराम थिटे, सतीश गावडे, तुकाराम सुक्रे, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यकांत थिटे, साहेबराव साकोरे आदींनी थिटेवाडी पाणी प्रश्न समिती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. 
 

संबंधित लेख