vilasrao uandalkar patil | Sarkarnama

विलासराव उंडाळकरांची जीभ घसरली : भाषणात म्हणाले, पोरं काढायची यांनी आणि ताप आम्हाला :

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

कऱ्हाड (जि. सातारा) : पंडीत नेहरू जयंतीनिमित्त कऱ्हाडच्या रयत संघटनेतर्फे डॉ. अशोक चौसाळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर यांची जीभ घसरली. ते म्हणाले, पोर काढायची यांनी आणि ताप आम्हाला. नाही तर गड बदलणार असे म्हणतात. आज ही वेगळीच सामाजिक संस्कृती निर्माण झाली आहे. पोर काढायची यांनी आणि नोकरी लावायची आम्ही. 

रयत संघटनेतर्फे पंडीत नेहरू जयंतीनिमित्त डॉ. अशोक चौसाळकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन 
करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकर बोलत होते. 

विलासराव पाटील उंडाळकर म्हणाले, सध्या मी ऐकायचे अन्‌ सोडून द्यायचे असे ठरविले आहे. सर्वजण माझ पोरगं नोकरीला लागतय का बघा, असे म्हणत येतात. नाही तर मी निघालो, असे म्हणतात. पोर काढायची यांनी आणि ताप आम्हाला. नाही तर गड बदलणार असे सांगतात. आज ही वेगळीच सामाजिक संस्कृती निर्माण झाली आहे. पोर काढायची यांनी आणि नोकरी लावायची आम्ही. गड बदलायचा म्हणजे भाजपमध्ये जायचे. कुणाकडे तर चंदुमामाकडे. काल कुठे होता, आज कुठे गेला हे कोणीही सांगत नाही. सर्व अवघड झाले आहे. म्हणून थोडे बदला.

यशवंतराव चव्हाणांनी तुम्हाला केवढी संधी निर्माण केली. तुम्हा सर्वांना शिक्षण मोफत केले. पंचायत राज आणले. सत्तेचे विक्रेंद्रीकरण केले. अनपड माणसांना संधी दिली. अनपड माणसे जिल्हा परिषदेपर्यंत गेली. या संधीतून तुमच्या जीवनाचा स्तर उंचावला. आज तुम्हाला याचे काहीही देणे घेणे राहिलेले नाही. गुटखा खायचा, रम मारायची आणि निघायचे. म्हणून म्हणतो बदल करा तुम्हाला वाचवायला कोणी नाही. दोन कोटी नोकऱ्या नाहीत. त्या हवेत गेल्या. 15 लाख रूपये देणार होते, वाट बघा.. सगळे हवेत आहे. दोन कोटी नोकऱ्या काय दोन नोकऱ्या मिळत नाहीत. तुम्ही दोन कोटी नोकऱ्यांची वाट पहात आहात. म्हणून म्हणतो जरा स्वत:च्या वागण्यात बदल करा तरच तुमचे जीवन सार्थ होईल. बहुजन समाज बलवान बनेल. किमान तुमची सभा तरी ऐकायला कोणी तरी येईल, असा सल्ला त्यांनी दिला. 

संबंधित लेख