vilasrao deshmukhs satara visit for mla ticket | Sarkarnama

तिकीटासाठी साताऱ्यात आलेले विलासराव दोन महिन्यांनी मुख्यमंत्रीच बनले! 

उमेश बांबरे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

सातारा : शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस वेगळी झाल्यानंतर कॉंग्रेसची धुरा साताऱ्याच्या प्रतापराव भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती. बदलत्या समीकरणांत विलासराव देशमुख यांना 1999 च्या विधानसभेचे तिकीट मागण्यासाठी साताऱ्याला भोसलेंकडे यावे लागले होते. 

विलासराव देशमुख यांची प्रतापराव भोसलेंशी भेट झाली, मात्र तिकीट अंतिम झाले नाही. त्यामुळे देशमुखांना साताऱ्यातच मुक्‍काम करावा लागला. दुसऱ्यादिवशी ते मुंबईला गेले. तिथे त्यांचे तिकीट कन्फर्म झाले. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव पुढे आले आणि त्यांनी शपथही घेतली. 

विलासराव कार्यक्रमांच्या निमित्ताने पुढे साताऱ्यात आले. त्यावेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीत सत्कार, जिल्हा बॅंकेतील कार्यक्रम असे दोन तीन कार्यक्रम त्यांनी स्वीकारले होते. त्यातील एका कार्यक्रमात नितीन भरगुडे पाटीलही उपस्थित होते. ते व्यासपीठासमोरच खाली बसले होते. यावेळी श्री. देशमुख आपल्या भाषणात म्हणाले, सातारा जिल्ह्याने नेहमीच मला पाठींबा दिलेला आहे. मी सत्तेत होतो, त्यावेळीही सातारा जिल्हा मला कार्यक्रमांसाठी बोलवतच होता. पण पराभव झालेला असतानाही मला नितीन भरगुडे पाटील यांनी कार्यक्रमाला बोलावले होते. 

संबंधित लेख