vilasrao deshmukh mlc mlc election story | Sarkarnama

तीन मित्रांची मते न मिळाल्यानेच विलासराव देशमुख कॉंग्रेसमध्ये राहिले! 

उमेश बांबरे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

विलासराव देशमुख यांचा 1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजपच्या पाठींब्यावर विधान परिषदेची निवडणुक लढली. या निवडणुकीत श्री. देशमुख यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला.

सातारा : विलासराव देशमुख यांचा 1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शिवसेना-भाजपच्या पाठींब्यावर विधान परिषदेची निवडणुक लढली. या निवडणुकीत श्री. देशमुख यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला. त्यावेळी तीन जवळच्या मित्रांनी त्यांना मतदान केले नव्हते. 

या तीन मित्रांमध्ये विलासराव पाटील-उंडाळकर, जयवंतराव आवळे, अनंतराव थोपटे यांचा समावेश आहे. मुळात भाजप-शिवसेनेच्या पाठींब्यावर त्यांनी विधान परिषदेची निवडणुक लढली होती. त्यावेळी या तीन मित्रांनी त्यांना साथ दिली नाही, याचे दु:ख विलासराव देशमुख यांना झाले. पण त्यांनी ते दाखविले नाही. या तीन मित्रांची मते न मिळाल्याने ते निवडून आले नाहीत. त्यानंतर श्री. देशमुख पुन्हा कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात आले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 

संबंधित लेख