vikrambaba patankar clarifies on proceedings | Sarkarnama

हिम्मत असेल तर फौजदारी दाखल करा: विक्रमबाबा पाटणकर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 डिसेंबर 2018

माझ्यावर प्रोसेडींग चोरीचा झालेला आरोप पुर्णत: खोटा आहे. मी प्रोसेडींग चोरले असे म्हणत असाल तर हिम्मत असेल तर माझ्यावर फौजदारी दाखल करा, असे पाटण बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

पाटण : माझ्यावर प्रोसेडींग चोरीचा झालेला आरोप पुर्णत: खोटा आहे. मी प्रोसेडींग चोरले असे म्हणत असाल तर हिम्मत असेल तर माझ्यावर फौजदारी दाखल करा, असे पाटण बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 

पाटणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सभापतींना विश्वासात न घेता चाललेला कारभार बेकायदेशीर असुन आपल्याला मासिक मिटींगमधील प्रोसेडींगमध्ये चुकीच्या बाबी आडळल्या म्हणून आपण या गोष्टीला विरोध केला. प्रोसेडींगमध्ये खडाखोड केलेले प्रोसेडींग चालु देणार नाही. म्हणून हे प्रोसेडींग तात्काळ सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात सादर केले. चुकीचे केलेले प्रोसेडींग त्यांच्या निर्दशनास आणुन दिले. तसे पत्र आपण सहाय्यक निबंधक यांच्याकडून घेतले आहे. सदर प्रोसेडींग त्याच वेळी बाजार समितीच्या कार्यालयात दाखल केले. 

विक्रमबाबा म्हणाले, की पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक सभा शुक्रवार दि.२१ डिसेंबर खेळीमेळीत सुरू होती. सभेपुढील सर्व विषयावर सादक-बाधक चर्चा सुरू होती. सभेत अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेला आल्यानंतर सर्वच अतिक्रमणे काढणे बाबत चर्चा झाली मात्र सौ. नयना हरिष सुर्यवंशी यांनी बेकायदेशीर मिळवलेल्या प्लाँटचे अतिक्रमण काढणेस उपसभापतीनी असमर्थता दर्शविली. एकाला एक न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय हि भूमिका योग्य नसल्याने व कायद्याला अभिप्रेत नसल्याने सर्वांना समान न्याय असावा. ही माझी भूमिका होती. सभेनंतर संबधीतांनी सभेचे प्रोसेडींग लिहणे बंधनकारक असते. मात्र या बाबत विचारणा केली असता प्रभारी सचिव यांनी मला प्रोसेडींग लिहता येत नाही. मी दुसऱ्याकडून दोन चार दिवसांनी लिहून घेतो. असे जुजबी उत्तर दिले. तसेच काही महिन्यांपूर्वी माझे अनुपस्थित प्रोसेडींग मधे सभा झालेनंतर दोन चार दिवसांनी त्यात खडाखुड झाल्याचे माझे निदर्शनास आले. यापूर्वी न झालेल्या सभांचे प्रोसेडींग सोयीने लिहण्यात आले. असून यामध्ये बेकायदेशीर बाबींना स्थान देऊन शासनाच्या विविध विभागांची दिशाभूल करण्यात आली आहे. म्हणूनच प्रोसेडींग लिहण्यास नकार दिल्याने सभापती म्हणून सदरचे प्रोसेडींग सहाय्यक निबंधक यांना सादर केले आहे. तसे पत्र माझ्याकडे आहे. 

याबाबत माझ्या विरोधात बदनामी करण्याचे हेतूने खोटी तक्रार दाखल केल्याचे ऐकीवात असुन हिम्मत असेल तर माझे विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्या ठिकाणी दुधका दुध व पाणी का पाणी करण्याची माझी तयारी आहे. याबाबत पणन संचालक यांचे मार्गदर्शन घेऊन संबंधित सचिव व बेकायदेशीर ठराव करणाऱ्यांचा लवकरच भांडाफोड करणार आहे. यापुर्वी झालेल्या बेकायदेशीर झालेल्या मिटींगांना सहाय्यक निबंधक, कृषी अधिकारी पाटण, पणनचे प्रतिनिधी यानां जाणीवपुर्वक मिटींगचे नोटीस देण्यात आलेले नाही. या वरुन चोर कोण आहे, हे स्पष्ट होते. लवकरच याबाबतची सखोल चौकशी करण्याची संबधित मंत्र्याकडे करणार असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे.

संबंधित लेख