vikhe-thorat issue is serious in congress | Sarkarnama

नगरचा विखे-थोरात वाद राहूल गांधींपर्यंत जाणार 

मुरलीधर कराळे 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कॉग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील धुसफूस अखेर कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत जाणार आहे. कॉग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील धुसफूस अखेर कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत जाणार आहे. 

नगर : कॉग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील धुसफूस अखेर कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत जाणार आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील कॉग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल नाशिकला बैठक झाली. या वेळी नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळाने अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीचे सचिव आशीष दुवा व सोनल पटेल यांच्यासमोर नगर जिल्ह्याची कैफियत मांडली. या शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख, युवक कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शहर जिल्हा कॉग्रेसचे प्रभारी अध्यक्ष दीप चव्हाण आदींचा समावेश होता. 

नगर जिल्ह्यातील कॉंग्रेस अंतर्गत अनेक पदांच्या निवडी रखडलेल्या आहेत. तालुकाध्यक्ष, जिल्हा कॉग्रेसचे पदाधिकारी, महिला कॉग्रेस पदाधिकारी, विविध सेलचे पदाधिकारी निवडी बाकी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कॉग्रेस अंतर्गत कामात शिथिलता निर्माण झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत कॉग्रेसला यश मिळविण्यासाठी विखे - थोरात यांच्यात समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे, अशी कैफियत शिष्टमंडळातील नेत्यांनी मांडली. 

आशीष दुवा व सोनल पटेल यांनी नगरकरांच्या समस्या एकूण घेतल्या. या सर्व स्थितीचा अहवाल तातडीने पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी खासदार मल्लीकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना देण्यात येणार असून, ते याबाबत तातडीने लक्ष घालतील, असे आश्वासन दुवा व पटेल यांनी दिले. 

संबंधित लेख