राधाकृष्ण विखेंनी एक वर्षापूर्वीच `योग्य जागा` निवडली होती...

राधाकृष्ण विखेंनी एक वर्षापूर्वीच `योग्य जागा` निवडली होती...

पुणे : विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश नक्की झाला असून ते रविवारी (ता. 16 जून) रोजी मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. ते काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार, याची चर्चा गेले वर्षभर होतीच. मात्र काॅंग्रेसमध्ये असताना त्यांनी आपली जागा योग्य निवडली होती, हे दिसून आले आहे. 

काॅंग्रेसने सप्टेंबर 2018 मध्ये फडणवीस सरकारच्या विरोधात जनसंघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेत काॅंग्रेसचे सर्व नेते एकाच व्हाॅल्वो बसमधून प्रवास करीत होते. या प्रवासाच्या दरम्यान विखे पाटलांनी नेमकी `इमर्जन्सी एक्झिट`शेजारी जागा मिळाली होते. तेव्हाचा तो फोटो व्हायरल झाला होतो. विखे पाटील हे काॅंग्रेसमधून कधीही बाहेर पडतील, अशी तेव्हा चर्चा होती. त्याचा विखेंनी तेव्हा वारंवार इन्कार केला होता. मात्र ती चर्चा अखेरीस खरी ठरली.

जनसंघर्ष यात्रा सुरू होण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विखे यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमात गेले होते. या कार्यक्रमात बोलताना विखे यांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस आघाडी सरकारपेक्षाही फडणवीस सरकारच्या काळात माझ्या मतदारसंघात अधिक निधी मिळाला, अशा शब्दांत फडणवीस सरकारचा गौरव केला होता. तेव्हाच विखे आणि फडणवीस यांच्या मैत्रीची चर्चा रंगली होती.

त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. त्यांचे पुत्र सुजय हे भाजपचे खासदार झाले. आता स्वतः विखे पाटील हे भाजपकडून मंत्री होत आहेत. त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये पटकवलेली जागा योग्य होती, हेच पुन्हा दिसून आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com