vikhe patil praises raj thackrey | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

विखे पाटलांकडून राज ठाकरेंचे कौतुक 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

राज ठाकरे आमचे मित्र आहेत

जळगाव : विरोधी पक्षाच्या आघाडीत राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाला घेण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेला प्रस्ताव कॉंग्रेसने नाकारला मात्र त्याच कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांनी काढलेल्या मोदीवर टिका करणाऱ्या व्यंगचित्राचे मात्र कौतुक केले आहे. 

राज ठाकरे यांनी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उलटा चरखा फिरवित असून कापडापासून सूत बनवित आहेत. बाजूला भाजपचे नेते अमित शहा उभे आहेत. असे व्यंगचित्र प्रसिध्द केले होते. त्यामुळे राज्यभर त्याची चर्चा झाली होती. 

मनसेच्या विरोधी असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांनीही त्याचे कौतुक केले आहे. कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील फैजपूर येथील संघर्ष यात्रेत बोलतांना म्हणाले, कि मनसेचे नेते राज ठाकरे आमचे मित्र आहेत. गांधी जयंतीच्या दिनी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उलटा चरखा फिरवित असल्याचे व्यंगचित्र काढले होते.खरंच आज देशाची परिस्थती अशीच आहे.

संबंधित लेख