vikhe patil praises abhijit bangar and rajesh deshmukh | Sarkarnama

IAS बांगर-देशमुखांनी SBI ला शुद्धीवर आणले, त्यांचे अभिनंदन! 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 जुलै 2018

पुणे : शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज नागपूर अधिवेशनात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्याबरोबरच शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी कडक भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

विखे पाटील म्हणले, राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीवरुन शेतकऱ्यांत नाराजी आहे. त्यामुळेच एकाही सत्ताधारी आमदाराने कर्जमाफीचे फलक लावलेले नाहीत. पीककर्जाच्या बाबतीतही शेतकऱ्यांना मदत झालेली नाही. अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर आणि यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भाने कडक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाची एसबीआयमध्ये असलेली खाती त्यांनी बंद केली. राष्ट्रीयकृत बॅंकांना झटका मिळाल्यानंतर पीककर्ज वाटपाला गती आली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी अभिनंदनिय काम केले आहे, असे विखे पाटील म्हणाले. 
 
संबंधित लेख