vikhe patil on nitesh rane | Sarkarnama

नितेश राणे बेताल वक्‍तव्ये करू नका: विखे   

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. कॉंग्रेसला राणे यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस सोडू नये, अशी भूमिका स्पष्ट करतानाच "आमदार नितेश राणे यांनी मात्र सवंग प्रसिद्धीसाठी बेताल वक्‍तव्ये करू नयेत. सिंधुदुर्गातील आंदोलनानंतर नितेश यांची अटक टाळण्यासाठी मी काय काय केले याची जाहीर वाच्यता करण्यास त्यांनी मला भाग पाडू नये,'' अशा शब्दांत विखे पाटील यांनी नितेश याच्या आरोपांना मंगळवारी प्रतिटोला लगावला आहे. 

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. कॉंग्रेसला राणे यांची गरज आहे. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेस सोडू नये, अशी भूमिका स्पष्ट करतानाच "आमदार नितेश राणे यांनी मात्र सवंग प्रसिद्धीसाठी बेताल वक्‍तव्ये करू नयेत. सिंधुदुर्गातील आंदोलनानंतर नितेश यांची अटक टाळण्यासाठी मी काय काय केले याची जाहीर वाच्यता करण्यास त्यांनी मला भाग पाडू नये,'' अशा शब्दांत विखे पाटील यांनी नितेश याच्या आरोपांना मंगळवारी प्रतिटोला लगावला आहे. 

माध्यमांच्या प्रतिनिधींशी आज बोलताना राणे यांनी कॉंग्रेस सोडू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा असल्याचे विखे पाटील म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदी विखे पाटील यांच्या कामगिरीबाबत नितेश राणे यांनी टीका केली होती. या बाबतच विचारले असता, ""नितेश राणे यांना राजकारणात खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. विधिमंडळातील कामकाजाबाबत त्यांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. राजकीयदृष्ट्या ते अजून अपरिपक्‍व आहेत,'' अशा शब्दांत विखे यांनी प्रत्युत्तर दिले. 

"नितेश राणे यांच्या अटकेची पोलिसांनी पूर्ण तयारी केली होती. त्या वेळी पक्षाचे आमदार म्हणून मी काय काय प्रयत्न केले याबाबतची जाहीर वाच्यता करायला लावू नये. अन्यथा त्यांची अडचण होईल,'' असा सबुरीचा सल्लाही विखे यांनी दिला. 

संबंधित लेख