vikhe patil news mumbai | Sarkarnama

सरकार आहे का नाटक कंपनी ? : विखे पाटील 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंबई : हे सरकार आहे का नाटक कंपनी ? बिजीपीचे नाव बदलून बॅंजो पार्टी ठेवायला हवा असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांच्या वतीने खेद व्यक्त करण्यासाठी ते विधानसभेत बोलत होते. 

मुंबई : हे सरकार आहे का नाटक कंपनी ? बिजीपीचे नाव बदलून बॅंजो पार्टी ठेवायला हवा असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांच्या वतीने खेद व्यक्त करण्यासाठी ते विधानसभेत बोलत होते. 

विखे पाटील म्हणाले, "" राज्यपालाचे अभिभाषण निराशजनक होते. धर्मा पाटीलांचे मृत्यू ही सगळ्या राज्याच्या मनाला चटका लावून जाणारी घटना होती. त्यांना साधी श्रध्दांजलीही या अभिभाषणात वाहिली नाही. ते जावू द्या निदान धर्मा पाटलांच्या कुटूंबियांना न्याय देण्यासाठी काही तरतूद केलीय का याचा उल्लेख या अभिभाषणात नाही. त्यामुळे राज्यसरकार गंभीर नसल्याचे सिद्ध होते. राज्य सरकारने मुख्यमंत्री असलेले एक गाण तयार केलं आहे. त्या गाण्यात आमचे मित्र 
सुधीरभाऊ ही खडकावर उभे असल्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सुधीरभाऊ खडकावर उभे राहिले हे बघून आम्हाला काळजी वाटली म्हणून आम्ही त्यांना फोन लावला, पण त्यांचा फोन लागला नाही. जर ते त्या खडकावरून पडले तर अर्थसंकल्प कोण मांडणार असा आम्हाला प्रश्न पडला आहे.'' 

रिव्हर अँन्थम या व्हायरल झालेल्या विडीओचा उल्लेख करत विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, " ती डाक्‍यूमेंटरी पाहिल्यावर हे सरकार आहे का नाटक कंपनी असा प्रश्न आम्हाला पडला आहे ? या विडीओमध्ये सेना कुठेच दिसली नाही. इतकी सेनेची उपेक्षा कशी काय करू शकते सरकार ? त्या विडीओमधून मुंबई महापालिकेच आयुक्त दिसतात तर तिकडे शिवसेनेचे महापौर कुणी घर देता का घर असं सांगत फिरत आहेत. 

राज्यपालांच्या अभिभाषणावर विखे पाटील भाष्य करताना सत्ताधारी सतत हरकत घेत असल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी हरकत घेतली ते म्हणाले, ""मुख्यमंत्री रिप्लाय देताना आम्ही पण पाच पाच मिनीटांना हरकत घेणार आहोत. चालेल का ?'' 

पर्यावरणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यासंदर्भात त्यांच्या सौभाग्यवतीही सहभागी होता. त्यामुळे त्या गाण्याचा उल्लेख करून महिलेचा अपमान होतोय म्हणून भाजपच्या मनिषा चौधरी हरकत घेतली. सत्ताधाऱ्यांकडून विखेपाटलांच्या भाषणावर आक्षेप घेतला. सत्ताधारी आमदार विखे पाटील यांच्या भाषणातील तो उल्लेख कामकाजातून वगळा म्हणून आक्रमक झाले होते. त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना तपासून काढून टाकण्याचे आदेश दिले. 

त्यावर विखे पाटील, " मी त्यांच्या पत्नीबद्दल मी बोललो नाही. त्याचं नावही घेतलेले नाही. त्यांच्यासंदर्भात कोणीही बोललं नाही. मी पंचवीस वर्ष या सदनाचा सदस्य आहे. त्यामुळे मी कुणाचा अवमान करणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिल्याने वादावर पडदा पडला. 

संबंधित लेख