vikhe patil news | Sarkarnama

भिडे गुरूजींचा धाक सरकारवर असल्याने प्रदीप भिडेंनाही काम करू दिले नाही, विखेंनी काढला चिमटा 

ब्रह्मा चट्टे 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई : दरवर्षी राज्यपालांच्या इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे करतात मात्र, भिडे गुरूजींचा धाक सरकारवर असल्याने प्रदीप भिडेंनाही सरकारने काम करू दिले नाही. त्यामुळेच राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद झाला नाही असा चिमटा विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी आज सरकारला काढला. 

विधानसभेच्या कामकाजाला आज सुरवात होताच विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद नसल्याने निषेध नोंदवत आक्षेप घेतला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितल्याने वादावर पडदा पडला. 

विधानसभेच्या कामकाजाचे आज बिगूल वाजले. सुरवातीलाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील नियम 97 अन्वये बोलायला उभे राहिले. 

विखे पाटील म्हणाले, " राज्यपालांनी राज्याचे आद्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आभिवादन करून भाषणाला सुरवात केली. मात्र,शिवाजी महाराजांच्या या राज्यात आज मराठीचा आवमान करण्यात आला. परंपरेप्रमाणे राज्यपालांच्या अभिभाषणांचे वाचन मराठीतून व्हायला हवे होते. मात्र तसे न करता या सरकारने मराठीचा अपमान केला आहे. 

शिवसेनेची मंडळी इंग्रजी ऐकत गप्प बसले, असा आरोप विखे पाटील यांनी करताच शिवसेनेच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गोंधळ वाढत असल्याने मुख्यमंत्री निवेदन करायला उभे राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "" विरोधकांनी मांडलेली बाब गंभीर आहे. दरवर्षी अर्थसंकल्पिय भाषणाचा मराठी अनुवाद होतो. यावर्षीही ते होणे गरजेचे होते. '' 

मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनाने समाधान न झाल्याने विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी असा अग्रह धरण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, " माझ्या माफी मागण्याने विषय संपत असेल तर आता माफी मागतो. परंतू हा विषय विधानसभेच्या अध्यक्षांच्या कक्षेत येतो. त्यामुळे त्यांच्याकडून या संदर्भात अत्यंत कडक कार्यवाही व्हावी, अशी विनंती मी करतो. आणि झालेल्या प्रकारबद्दल मी सरकारच्यावतीने माफी मागतो. 

संबंधित लेख