vikhe patil news | Sarkarnama

सरकारच निराशेने ग्रासले : विखे पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मुंबई : विरोधक नव्हे तर सरकारच निराशेने ग्रासले आहे, असे प्रत्युत्तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. आज पासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. 

विरोधक वैफल्यग्रस्त असल्याचे विधान काल मुख्यमंत्र्यांनी केले होते. यावर बोलताना विखे पाटील म्हणाले की, मला त्यांना इतकेच सांगायचे आहे की, नैराश्यग्रस्त विरोधक नाहीत, तर सरकारच निराशेनं ग्रासलेलं आहे.

सरकारचं कर्तृत्व शून्य आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष आपल्याला घेरणार याची जाणीव असल्यामुळे त्यांनी बरोबर अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर बोंडअळी व तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांना मदत निर्गमित करण्याचा आदेश काढला. आपल्याला आठवत असेल गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर शनिवार-रविवार बॅंका उघड्या ठेवून यांनी कर्जमाफीचे पैसे वितरीत करायला सुरूवात केली होती.

ऐन अधिवेशनाच्या अगोदर सरकारला असे निर्णय घ्यावे लागतात, यावरून घाबरलेलं कोण आहे? हतबल कोण आहे? याची जाणीव होते.

राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले की, गेल्या आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्यांक,महिला आणि बेरोजगारांना न्याय देण्यासंदर्भात सरकारची ठाम भूमिका आजच्या अभिभाषणामध्ये स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती. राज्यातील सर्व समाजघटकांना न्याय देण्याबाबत आम्ही केलेल्या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मात्र सर्वांचा अपेक्षभंग झाला आहे.

संबंधित लेख