vikhe patil criticizes udhhav thakrey | Sarkarnama

वडिलांच्या स्मारकाला जागा न देणारे उद्धव ठाकरे हे ठगच : विखे पाटील

उमेश घोंगडे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

पुणे : वडिलांच्या स्मारकासाठी आपल्या घराची जागा न देणारे उद्धव ठाकरे राम मंदीर बांधण्याच्या वल्गना करीत आहेत. खरी तरी ही एक ठगबाजीच आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज केली.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवरदेखील टीका केली. ज्या पद्धतीने गेल्या चार वर्षात या सरकारने कारभार केला आहे. त्याला "ठग्ज ऑफ महाराष्ट्र' असेच म्हणावे लागेल, अशी टीका पाटील यांनी केली आहे. 

चार वर्षात शेतकऱ्यांपासून राज्यातील साऱ्याच घटकांना फसवण्याचा उद्योग या सरकारने केला आहे. राज्य सरकारची ही ठगबाजी राज्यातील जनता सहन करणार नाही. या सरकारला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला सहा वर्षे झाली. या काळात त्यांच्या स्मारकाचा विषय चर्चेत आहे. मात्र अद्याप ते पूर्णत्वास गेले नाही. त्याला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. ठाकरे यांच्या स्मारकासाठी मातोश्री हेच उत्तम ठिकाण होते. मात्र स्वत:च्या वडिलांच्या स्मारकासाठी जागा देऊ न शकलेले उद्धव ठाकरे आयोध्येतील राम मंदीर बांधण्याच्या गप्पा मारतात, असे विखे-पाटील यांनी सांगितले. 

विधिमंडळाचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. सरकारच्या अपयशला हे दोघेही जबाबदार आहेत. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. कर्जमाफी योग्य पद्धतीने केलेली नाही. दुष्काळ निवारणाचे कोणतेही नियोजन नाही. हे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी असून सर्वसामान्यांची फसवणूक करणारे आहे. 

संबंधित लेख