vikhe and thorat is national artist ashok chavan | Sarkarnama

विखे-थोरात दोघेही राष्ट्रीय कलावंत : अशोक चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

संगमनेर (नगर), ः नगर जिल्ह्यात विखे आणि थोरात वेळ आल्यावर एकत्र येतात. दोघेही राष्ट्रीय कलावंत आहेत. आता ते एकत्र आलेत. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेसमय झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, राज्यात फडणवीस सरकार 31 ऑक्‍टोबरला कर्ज माफी करणार, असे सांगते. सध्या पंचांग पाहून राज्यात कारभार सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. 

कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीरसभेत चव्हाण बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात तसेच राज्यभरातून आलेले पदाधिकारी आणि नगर जिल्ह्यातील कॉंग्रेसजन उपस्थित होते. 

पाच राज्याच्या निवडणुका झाल्या आहेत. कुणीच समाधानी नाही. सरकारची निव्वळ फसवणूक सुरू आहे. ग्रामीण भागाची कणा असलेली सहकार चळवळ मोडीत काढण्याचे काम सध्या सुरू आहे. केवळ टोलवाटोलवी करणारे हे सरकार खाली खेचा. आता परिवर्तन अटळ आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 

चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही. त्यांची घोर फसवणूक केली आहे. उत्पन्न दुप्पट करू, हमी भाव देऊ, असे सांगणाऱ्या सरकारने काहीच केले नाही. कृषी अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली आहे. युवकांना नोकरी नाही. बेरोजगारी वाढली आहे. झिझिया कर लावले जात आहेत. दोन्ही सरकार केवळ धून काढत आहे. आर्थिक लूट चालू आहे. कायदा सुव्यवस्था तर आजिबात राहिली नाही. अशा स्थितीत जनतेला कॉंग्रेसच हाच एकमेव पर्याय आहे. 

राज्यात कॉंग्रेसची लाट येत आहे. अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. शेतकरी, व्यापारी, युवक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असे आवाहन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. 

पंतप्रधान मन की बात करतात, तर राहुल गांधी दिल की बात करतात. देर आये दुरुस्त आये असे सांगून माजी मंत्री नसीम खान म्हणाले, जिल्ह्यात विखे - थोरात यांचे मनोमिलन होणे गरजेचे होते. ते आता झाले आहे. त्यामुळे जिल्हा कॉंग्रेसमय करणे अवघड नाही. 

संबंधित लेख