vikas thakray | Sarkarnama

राहुल गांधी नागपुरातून रणशिंग फुंकणार : विकास ठाकरे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

नागपूर ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातील कॉंग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लवकरच नागपुरात येणार आहेत. नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नागपुरात येऊन रणशिंग फुंकण्याचे मान्य केले आहे. 

कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांपर्यंत संघटन मजबूत झाले पाहिजे, असा विचार मांडला होता. यासंदर्भात सर्व जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षांना अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन नागपूर शहराचा अहवाल सादर केला. यात गेल्या चार वर्षात कॉंग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाची सचित्र माहिती आहे. तसेच शहरातील 1945 बुथ कार्यकर्त्यांची यादी आहे. 

नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती शहर असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने आपण येथील बुथकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात यावे, असे निमंत्रण विकास ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिले. ही विनंती राहुल गांधी यांनी तात्काळ मान्य केली व तेथे उपस्थित असलेले महाराष्ट्रचे प्रभारी मल्लिाकार्जुन खर्गे व कॉंग्रेसचे महासचिव अशोक गहलोत यांना कार्यक्रम निश्‍चित करण्याचे निर्देश दिले. 

यावेळी कॉंग्रेसचे विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अभिजीत वंजारी, प्रशांत धवड, नगरसेवक संदीप सहारे, संजय महाकाळकर, हरीश ग्वालवंशी, नितीश ग्वालवंशी, दीपक वानखेडे, योगेश तिवारी, मनोज सांगोळे, विवेक निकोसे, प्रवीण गवरे आदी उपस्थित होते. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची राहुल गांधी यांनी प्रशंसा केली, असे विकास ठाकरे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

संबंधित लेख