vijaya rahatkar | Sarkarnama

पक्षाने आदेश दिल्यास लोकसभा लढवणार - विजया रहाटकर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

महिला आरक्षणाचे विधेयक भाजपने बहुमत असल्यामुळे लोकसभा व राज्यसभेत मंजुर करून घ्यावे या कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मागणीला तुमचे समर्थन आहे का? या प्रश्‍नावर राज्य महिला आयोगाची अध्यक्ष व भाजप महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझे अनुमोदन आहे. महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे हीच भाजपची देखील भूमिका आहे व सरकार याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद : आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात मी कधी पक्षाकडे काही मागितले नाही, पक्षाने दिली ती जबाबादारी स्वीकारली. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याचा आदेश पक्षाने दिला तर तो मी पाळेल. शेवटी "पक्षाचा निर्णय तो माझा निर्णय' असे सांगत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष विजया रहाटकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार का ? हा पत्रकारांनी विचारलेला प्रश्‍न टोलावला. 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने येत्या 1 ऑक्‍टोबर रोजी राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या महिला ग्रामसभेत गर्भलिंग निदान न करण्याचा ठराव व शपथ घेण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत विजया रहाटकर बोलत होत्या. महिला आरक्षणाचे विधेयक भाजपने बहुमत असल्यामुळे लोकसभा व राज्यसभेत मंजुर करून घ्यावे या कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मागणीला तुमचे समर्थन आहे का? या प्रश्‍नावर राज्य महिला आयोगाची अध्यक्ष व भाजप महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून माझे अनुमोदन आहे. महिलांना आरक्षण मिळाले पाहिजे हीच भाजपची देखील भूमिका आहे व सरकार याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत असल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले. 

महिला ग्रामसभेत होणार हे ठराव 
- मी गर्भलिंग निदान करणार नाही, कुटुंबातील कुठल्याही स्त्री गर्भाचे लिंग निदान करणार नाही, होऊ देणार नाही, 
मुलगी शाळाबाह्य होऊ देणार नाही, ग्रामपंचायत विकास आराखड्यातील 10 टक्के निधी महिलांसाठी राखीव, महिलांनी उघड्यावर शौचास जाऊ नये, प्रत्येक घरी शौचालय बांधणार 

संबंधित लेख