Vijay Singhal suspends 14 employees of Mumbai corporation | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

सिंघल यांचा धडाका :बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार होणारे  14 पालिका कर्मचारी निलंबित  

विष्णू सोनवणे 
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

पालिकेच्या चोवीस विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामांची दररोज सकाळी पाहणी करावी तसेच कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी.
विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

मुंबई  :    मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  विजय सिंघल यांनी कामात कुचराई करणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून शुक्रवारी  बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार होणाऱ्या   14 जणांवर  निलंबनाची कारवाई केली आहे . 

 कुलाबा येथील नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राईव्ह) परिसरात बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार होणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या 14 पालिका कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कामगारांशी संबंधित दोन  पर्यवेक्षक तसेचच एका सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकास 'कारणे दाखवा नोटीस'ही बजावण्यात आली आहे.

फोर्ट, कुलाबा, कफ परेड, चर्चगेट यासह 'नेताजी सुभाष मार्गाच्या (मरीन ड्राईव्ह) काही भागाचा समावेश होतो. याच 'मरिन ड्राईव्ह' परिसरातील साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या कामगारांची आणि त्यांच्या कामांची 'अचानक तपासणी' करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले होते.

या आदेशांनुसार 'मरिन ड्राईव्ह' परिसरातील साफसफाई बाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'अचानक तपासणी' केली. त्या तपासणी दरम्यान कर्तव्यावर असणे अपेक्षित असलेले कामगार हे 'बायोमेट्रीक हजेरी' नोंदवून पसार झाल्याचे आढळून आले. यानंतर सदर 13 कामगारांसह एका मुकादमावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती कुलाबा येथील 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

 

संबंधित लेख