vijay shivtare and king | Sarkarnama

कडव्या शिवसैनिकांची साथ मिळाल्यास सर्व राजे घरी बसवू : विजय शिवतारे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

कोरेगाव (जि. सातारा) : शिवसेनेच्या माध्यमातून दहा-वीस कडवे कार्यकर्ते सोबतीला मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील सर्व राजे घरी बसवू शकतो, अशा शब्दांत नामोल्लेख टाळून पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यातील दोन्ही राजांना आव्हान दिले. शिवसेनेतर्फे कोरेगावात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. 

श्री. शिवतारे म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर, शेतीचे पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी बियाणे अशा विविध उपाय योजनांचे नियोजन शासनाने केले आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेला दुष्काळी समस्यांची जाणीव होऊ न देण्याची काळजी घेण्यात आली आहे. येत्या वर्षभरात जिहे-कटापूर योजना निश्‍चितपणे मार्गी लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतीला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध होणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून दहा-वीस कडवे कार्यकर्ते सोबतीला मिळाल्यास सातारा जिल्ह्यातील सर्व राजे घरी बसवू शकतो. 

शिवसेनेची जनतेशी बांधिलकी असल्यामुळे जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितिन बानुगडे पाटील, सदाशिव सपकाळ, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, मालोजी भोसले उपस्थित होते. 
 
संबंधित लेख